धार्मिक स्थळे

गावात प्रवेष करताना दर्षन होते ते लहान मुलांचे दैवत असलेले मुंजे महाराज यांचे व नंतर प्रवेष गावात होतो.  म्हैसपूर गावात पुरातन षिवमंदीर आहे.  अनेक वर्च्चापासून हे मंदिर येथे आहे व मंदिराचे पूर्ण काम दगडामध्ये केलेले आहे.  मंदरि, विठ्ठल-रुख्मीणी मंदिर व गजानन महाराज मंदिर असून लगतच ग्राम पंचायत कार्यालय व समोर प्रषस्त असा वाटा बांधलेला आहे.  तर बाजूला काही अंतरावर श्री. उदासी महाराज यांचे मंदिर व भव्य इमारत बांधलेली असून थोडया अंतरावर सोपीनाथ महारांचे मंदिर आहे.  सोपिनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये नागपंचमीचा सण मोठया उत्साहात साजरा करण्यात येतो.