होम

नावाविषयी माहिती

मोर्णा नदीच्या तिरावर म्हैसपुर हे माझे गाव वसलेले आहे.  अकोला द्याहरापासून काही अंतरावरच असे हे गाव.  ऐतिहासिक असे काही नाही, पण पुर्वजापासून म्हैसपूर नाव गावाला पडले आहे.

शैक्षणिक
शैक्षणिक सुविधामध्ये गाव ब-यापैकी आहे.  गावात जिल्हा परिच्चद प्राथमिक द्यााळा आहे.  तसेच म्हैसपूर मध्ये माध्यमिक षिक्षणाची व्यवस्था राम-रुख्मीणी विद्यालयाच्या माध्यमातून केलेली आहे. त्यामुळे मुलांची १० वी पर्यंतची सोय होते पण नंतर पुढच्या षिक्षणाकरीता द्याहारामध्ये जावे लागते.  यामध्ये सुध्दा ज्यांची आर्थिक बाजू किंवा परिस्थिती साधारण चांगली आहे ते पालक आपल्या मुलाला षिक्षणाकरिता द्याहरात पाठवितात.  पण गरिब बिचारे आपल्या मुलाला षिकवू द्याकत नाहीत.

आरोग्य
गावामध्ये या सुविधेची उणीव प्रामुख्याने जाणवते.  गावाची लोकसंख्या ३००० असूनही प्राथमिक आरोग्य केन्द्रासारखी सुविधा गावात उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांना खाजगी दवाखान्यात जावे लागते. त्यामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती कमजोर होत आहे.  तसा खाजगी दवाखाना गावात एकच आहे. तो सुरु नसता की, मग सरळ द्याहरात जावे लागते म्हणजे आणखी खर्चाची बाब त्यामुळे गावात प्राथमिक आरोग्य केंद्र असणे जरुरीचे आहे याकडे द्याासनाने लक्ष दयायला पाहिजे.

रस्ता
गावाला पक्का डांबरीकरण रस्ता नाही ही सगळयात मोठी समस्या आहे. कारण रस्ता चांगला नाही म्हणून विद्यार्थ्यांनी , नागरिकांना तसेच रुग्ण व वृध्दांना परेषानीचा सामना करावा लागतो.  उच्च षिक्षणाची सोय नसल्यामुळे पुढील षिक्षणाला विद्यार्थ्याला द्याहरात जावे लागते म्हणजे उच्च षिक्षणाची समस्या आहे.

आरोग्य केंद्र नसल्यामुळे नागरिकांमध्ये बिमारीचे प्रमाण जास्त व खाजगी दवाखान्यात जावे लागते म्हणून खर्च जास्त होतो.  त्यामुळे आर्थिक परिस्थिती ढासाळते म्हणून इथे आरोग्य एक समस्या आहे.